सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्रासाठी २.५० कोटींचा प्रस्ताव

वाशिम : शासन निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यात सेंद्रीय भाजीपाला आणि रानभाज्या विक्री केंद्र सुरू केले जाणार आहेत. यात वाशिम येथे कृषी विभाग आत्मातर्फे सेंद्रीय भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यासाठी २.५० कोटींचा प्रस्ताव कृषी उपसंचालकांमार्फत जिल्हा नियोजन अधिकाºयांकडे गत आठवड्यात पाठविण्यात आला. तात्पुरत्या स्वरूपात ‘आत्मा’ कार्यालयाच्या सभागृहात विक्री व्यवस्था करण्यात येत आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) वाशिम अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रिय शेती), डॉ.पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन व भारतीय प्राकृतिक शेती पध्दती या योजनेतील सेंद्रिय शेतकरी गटांनी जिल्ह्यात सेंद्रिय/जैविक पध्दतीने पिकविलेला भाजीपाला, फळे, अन्यधान्य, कडधान्य, दुध, गावरान अंडी आदिंचे उत्पादन थेट शेतकरी ते ग्राहक विक्रीचे नियोजन प्रकल्प संचालक, आत्मा यांनी केले आहे. यासाठी जिल्हास्तरावर विक्री केंद्राची स्थापना केली जाणार आहे. आत्मा कार्यालयातर्फे ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी शेतकरी गटांची नोंदणी केली आहे. त्यासाठीच कृषी उपसंचालकांमार्फत जिल्हा नियोजन अधिक...