कंपोस्टखत करण्याच्या पद्धती बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर जसा परिणाम होत आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला कमी झालेल्या जमिनीचा कसही कारणीभूत आहे. संकरित जाती आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामांमध्ये एकापाठोपाठ पिके घेत आहे, त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही. खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने हजारो जमिनी क्षारपड झाल्या आहेत. अशा मानवनिर्मित समस्या सोडविण्यासाठी उपाय योजावे लागणार आहेत. जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्यक आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, पिकाचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती खाली दिल्याप्रमाणे आहेत - इंदौर पद्धत - - इंदौर पद्धतीलाच ढीग पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे 6 फूट रुंद व 5 ते 6 फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून शेतातील उ...
Comments
Post a Comment