Posts

onion

Image
,  घरपोच खते मिळवा   Order Now

एक किलो शेणखत मधे मिळणारे घटक

Image
Image
Image
Image

कंपोस्टखत करण्याच्या पद्धती

Image
कंपोस्टखत करण्याच्या पद्धती     बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर जसा परिणाम होत आहे, त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला कमी झालेल्या जमिनीचा कसही कारणीभूत आहे. संकरित जाती आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामांमध्ये एकापाठोपाठ पिके घेत आहे, त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही. खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापराने हजारो जमिनी क्षारपड झाल्या आहेत. अशा मानवनिर्मित समस्या सोडविण्यासाठी उपाय योजावे लागणार आहेत. जमिनीचा कस टिकविण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते. शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र, पिकाचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूंच्या सहयोगाने कुजवून तयार केलेले खत म्हणजे कंपोस्ट खत होय. कंपोस्ट खत तयार करण्याच्या पद्धती खाली दिल्याप्रमाणे आहेत - इंदौर पद्धत - - इंदौर पद्धतीलाच ढीग पद्धत म्हणतात. या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे 6 फूट रुंद व 5 ते 6 फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून शेतातील उ...

कंपोस्ट खताचे फायदे

Image
कंपोस्ट खताचे फायदे - - कंपोस्ट खत हा सर्वसामान्य शेतकरी स्वतःच्या शेतावर तयार करू शकतो. - कंपोस्ट खतनिर्मिती ही खर्चिक नसून, आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखी आहे. टाकाऊ सेंद्रिय पदार्थाचा पुनर्वापर होतो. - कंपोस्ट खतामुळे जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढल्याने धूप कमी होते. - कंपोस्ट खतामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढते. त्यामुळे जमिनीची सुपिकता टिकवून सूक्ष्म जीवांची संख्या वाढते.
Image

गांडूळ खत

Image
गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड तयार करण्याचा सल्ला दिला जात असतो. ज्यांच्याकडे शेड घालण्यासाठी खर्च करण्याची ऐपत असेल त्यांनी पत्र्याचे किंवा तसले मजबूत शेड तयार करायला काही हरकत नाही. परंतु गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड आवश्यक नाही. गांडुळाला उन्हापासून त्रास होतो म्हणून त्याला सावली पाहिजे आहे. ती छपराने सुद्धा देता येते. साधे कुडाचे शेड जरी केले तरी गांडूळ खत तयार करण्यात काही अडचण येत नाही. या छपराखाली आपल्या गरजेनुसार एक मोठा गादी वाङ्गा करावा आणि त्यात गांडूळ सोडून द्यावेत. या गांडुळांना खायला काही तरी देत रहावे. म्हणजे त्या वाफ्यावरच त्या खाल्लेल्या वस्तूपासून ती गांडुळे खत तयार करत राहतील. हेच गांडूळ खत होय. या वाफ्यावर पाचट किंवा गव्हाचे काड असे आच्छादन टाकावे. म्हणजे गांडुळाला उन्हापासून आणखी संरक्षण मिळेल. या वाफ्यावरच्या गांडुळाला खायला काय दिले पाहिजे ? आपल्या शेतातल्या खताच्या खड्ड्यातील ७० टक्के पर्यंत कुजलेला कचरा त्याला दिला तरी चालतो. किंवा त्याला खायला सोपा जाईल असा हलका सेंद्रीय कचरा दिला तरी ते तो कचरा खाऊ शकते.